Friday, April 18, 2008
चंद्रशेखर शिखरे यांचे प्रतिइतिहास हे पुस्तक जिजाई प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. शिवयारांच्या आयुष्यावर झगझगीत प्रकाश टाकणारे हे पुस्तक खरच अभ्यासपुर्ण आहे. या पुस्तकास आ. ह. साळुंखे यांची प्रस्तावना लाभली असून पुरुषोत्तम खेडेकर यांनीसुद्धा या पुस्तकाच्या सुरुवातीस आपले मनोगत स्पष्ट केले आहे. स्वतः लेखकाने प्रति इतिहास हे नाव ठेवण्यामागची व एकंदरीतच पुस्तक लिहिण्यामागची भुमिका स्पष्ट केली आहे.
लेखकाची भूमिका .....
प्रस्तुत लेखनप्रपंच म्हणजे शिवकालीन इतिहासाच्या संदर्भात ब्राम्हनी इतिहासकारानी निर्माण करून ठेवलेल्या काही समस्यांचे निराकरण करण्याचा अर्थात शिवइतिहासाचे शुद्धिकरण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र एवढाच मर्यादित हेतु नसून शिवकालीन इतिहासाच्या पुनरमांडनीचा हा प्रयत्न आहे .