Thursday, October 28, 2010

shahajiraje with jijau and shivaji maharaj


Swarajyasankalpak shahajiraje bhosale , Swarajyaprearana jijau , Swarajyanirmate shivaji maharaj...

Sunday, May 9, 2010

इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे- रघुनाथराजे निबाळकर यांची टीका

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : ''मराठा समाज हा पालकत्व करणारा आणि नेतृत्व देणारा समाज आहे. त्याने मराठा समाजातील सर्व वर्गांना जवळ करावे. ज्यांनी इतिहास घडविला त्यांनी तो लिहिला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी त्याचे विकृतीकरण केले आहे,'' अशी टीका फलटणचे रघुनाथराजे निबाळकर यांनी केली.'महात्मा जोतिराव फुले इतिहास अकादमी'च्या वतीने 'पहिली मराठा इतिहास परिषद' घेण्यात आली. निंबाळकर यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. अशोक राणा अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, भाई कात्रे, राजारामबापू, डॉ. एस. सी. गंगावार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी निबाळकर म्हणाले, ''एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली, की ती खरी वाटू लागते. अशाच पद्धतीने इतिहासही लिहिला गेला आहे. तथाकथित इतिहास लिहिणाऱ्यांनी इतिहासाचा गळा घोटला आहे. त्याचे बाजारीकरण केले आहे. अशा इतिहासकारांना आम्ही राजघराण्यांनीच डोक्यावर घेतले आहे.'' राजकारण्यांवर टीका करताना ते म्हणाले, ''आता राजघराण्यांचा काळ गेला, सध्या पुढाऱ्यांचा काळ आहे. इतिहास सुधारायचा असेल, तर आधी पुढाऱ्यांना सुधारावे लागेल. पण, सध्याचे राजकारणी जमिनी बळकावण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात पुढे आहेत. या पुढाऱ्यांना सुधारण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मतदान करण्याची गरज आहे.''

प्रा. राणा म्हणाले, ''या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा म्हणजे नेमका कोण, हा प्रश्न निर्माण होतो. महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या एका पुस्तकात मराठा कोण, याविषयी म्हटले आहे, 'जो ब्राह्यण नाही तो मराठा.' भारतीय प्राचीन इतिहासातून या विधानाला पूरक संदर्भ आढळतात. पण, मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत मोठी समस्या आहे ती क्षत्तियत्वाच्या मान्यतेची. विशेषत: शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तिचे भीषण स्वरूप पुढे आले आहे. अमराठी राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत यावर आणिखीन वाद झाले. अजूनही ती समस्या सुटलेली नाही. म्हणून या व्यासपीठावर या विषयावरही चर्चा व्हावी, असे वाटते.'कोकाटे, पोकळे यांनीही या वेळी आपल्या भूमिका मांडल्या. परिषदेच्या वतीने दोन दिवसीय परिसंवाद होणार आहेत. प्रा. एम. एल. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रोहिणी कोडीतकर यांनी आभार मानले.

हितसंबंधाच्या कक्षेतूनच इतिहासाचे लेखन : ढमाले .पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वत:च्या हितसंबंधाच्या कक्षेतून माणूस इतिहासाकडे वळतो, त्यातून त्या त्या काळाचा अजेंडा म्हणून इतिहासाची निर्मिती, पुनर्निर्मिती होत जाते. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे लिखाणही अशाप्रकारेच झाल्याचे मत डाव्या चळवळीचे कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले यांनी व्यक्त केले.महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमीच्या वतीने आयोजित पहिल्या मराठा इतिहास परिषदेतील 'शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह' या परिसंवादामध्ये ते बोलत होते. डॉ. उमेश कदम, डॉ. अनिल शिगारे यांनी या परिसंवादामध्ये भाग घेतला.शिवाजीमहाराजांच्या इतिहास लेखनाचे सध्या तीन प्रवाह दिसून येत असल्याचे स्पष्ट करून ढमाले म्हणाले, ''ब्राम्हणेतर चळवळीतून पुढे आलेला प्रवाह, कॉ. शरद पाटील यांनी विकसित केलेला जातिव्यवस्था व स्त्री दास्यमुक्तीचा प्रवाह, डॉ. सदानंद मोरे यांचे वारकरी प्रारूप, अशा तीन प्रकारे शिवाजीमहाराजांच्या इतिहासाचे लेखन केले जात आहे.

ब्राह्यणेतर चळवळ पुढे नेणाऱ्या मराठा सेवा संघाने शिवाजी महाराजांची गोब्राह्यण प्रतिपालक ही ओळख पुसून कुळवाडी भूषण ही ओळख पुढे आणण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज यांनी जमिनी नसलेल्या जाती- जमातींना पडीक जमिनी कसण्यासाठी दिल्या. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना त्या जाती-जमातींमध्ये निर्माण झाल्याचे कॉ. शरद पाटील यांनी मत मांडले आहे. सदानंद मोरे यांनी तुकोबारायांना अग्रभागी ठेवून इतिहासाची मांडणी केली आहे.''महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांवर कुळवाडी भूषण हा पोवाडा लिहिला होता. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे रूपांतर पुढील काळामध्ये ब्राह्यमणेतर चळवळीमध्ये झाले. शिवाजीमहाराज व रामदास स्वामी यांची भेट १६७२ मध्ये झाली तोपर्यंत स्वराज्याची स्थापना झालेली होती. त्यामुळे रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणता येणार नाही. शिवकालीन इतिहासाचा वापर स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामध्ये केला गेला. या चळवळीचे शिवाजी महाराज प्रतीक बनले होते, असे ढमाले यांनी सांगितले.

Tuesday, April 27, 2010

पहिली मराठा इतिहास परिषद पुण्यात
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 28, 2010 AT 12:00 AM (IST)
सोलापूर - महात्मा जोतीराव फुले इतिहास अकादमी आयोजित पहिली मराठा इतिहास परिषद पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कतिक भवन येथे 8 व 9 मेरोजी होणार असल्याचे इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी कळविले आहे.रघुनाथराजे निंबाळकर यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी इतिहास व धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा. अशोक राणा असणार आहेत. राहूल पोकळे स्वागताध्यक्ष आहेत. समारोप सत्राचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर असणार आहेत.आठ मेरोजी पहिल्या सत्रात शिवकाळाचे इतिहास लेखन : पध्दतीशास्त्र आणि सिध्दांत या विषयावर ऍड. अनंत दारवटकर, रोहिणी कोडितकर वक्‍ते बोलणार असून, प्रा. देवेंद्र इंगळे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या सत्रात शिवकालीन इतिहास लेखनातील विविध प्रवाह या विषयावर प्रा. डॉ. उमेश कदम, प्र्रा सचिन गरूड, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, कॉ. किशोर ढमाले बोलणार असून, डॉ. अनिल शिनगारे अध्यक्ष असणार आहेत. तिसऱ्या सत्रात शिव इतिहास व विविध माध्यमे : चित्रण या विषयावर गंगाधर बनबरे, मदन पाटील, इंद्रजित सावंत बोलणार असून, डॉ. शरणकुमार निंबाळे अध्यक्षस्थानी आहेत. चौथ्या सत्रात अभ्यासक्रमातील शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास या विषयावर प्रा. डॉ. उमेश बगाडे आणि कागल येथील शिवराज्य मंचचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजीमहाराज हे नाटक सादर करणार आहेत.9 मेरोजी सकाळच्या सत्रात शिवकर्तृत्वाचे विविध पैलू , शिवकाळाचे इतिहास लेखन : लेखकांचे योगदान या दोन विषयावर शोधनिबंध वाचन होणार आहे. दुसऱ्या सत्रात शिवकालीन इतिहास लेखनाबाबत संभाव्य दिशा दिग्दर्शन या विषयावर ऍड. गाझीयोद्दिन सय्यद, प्रा. डॉ. निरज साळुंखे, प्रा. डॉ. रामभाऊ मुटकुळे बोलणार असून, डॉ. पी.ए. गवळी अध्यक्षस्थानी आहेत. तिसऱ्या सत्रात शिवकालीन विस्थापितांचा इतिहास या विषयावर जयपाल चव्हाण, डॉ. एस.सी. गंगवार, डॉ. रोशनलाल गंगवार बोलणार आहेत. चौथ्या सत्रात इतिहास लेखकाकडून अपेक्षा या विषयावर राहूल पोकळे, रविंद्र माळवदकर बोलणार असून, प्रभाकर ढगे अध्यक्षस्थानी आहेत.समारोप सत्रात दिपक मानकर, चेतन तुपे, दिगंबर दुर्गाडे, अनिल जगताप उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राजाभाऊ पासलकर, दत्ता नलावडे, राम पायगुडे, प्रमोद मांडे यांचा विशेष सत्कार होणार आहे. सर्वांनी इतिहास परिषदेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. कोकाटे यांनी केले आहे


पुणे में पहली मराठा इतिहास परिषद
SATURDAY, 17 APRIL 2010 14:02
आगामी ८ व ९ मई को भव्य आयोजनरघुनाथ राजे निंबालकर करव्ंगे उद्घाटनपुरूषोत्तम खेडेकर की अध्यक्षता में परिषद का शानदार

-महात्मा द्गयोतिबा फुले इतिहास अकादमी की ओर से पहली मराठा इतिहास परिषद का आगामी ८ व ९ मई को पुणे में डॉ. बाबासाहब आंबेडकर सांस्कृतिक भवन में आयोजन किया गया है.दो दिवसीय परिषद का उद्घाटन पलटण के रघुनाथ राजे निंबालकर करव्ंगे. स्वागताध्यक्ष राहुल पोकले है. उद्घाटन सत्र इतिहास व धर्मशास्त्र के विद्वान अध्येता प्रा. अशोक राणा की अध्यक्षता में होगा. समापन सत्र की अध्यक्षता मराठा सेवा संघ के संस्थापक, अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर करव्ंगे.परिषद में शिवकालीन इतिहास लेखन, प्रणाली शास्त्र और सिध्दांत विषय पर ८ मई को एड. अनंत दाखटकर, रोहिणी कोडतकर, देवेन्द्र इंगले, तथा दूसरव् 'शिवकालीन इतिहास लेखन के विभिन्ना प्रवाह' विषय के चर्चा सत्र में प्रा. डॉ. उमेश कदम प्रा. सचिन गरूड, प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, कॉ. किशोर उमाले, डॉ. अनिल शिंगारव्, तीसरव् सत्र में 'शिव इतिहास व विविध माध्यम' विषय पर गंगाधर बनबरव्, मदन पाटील, इंद्रजीत सावंत, डॉ. शरणकुमार लिंबाले, और चौथे सत्र में 'शिवकालीन इतिहास वास्तव आणि विपर्यास' विषय पर प्रा. डॉ. उमेश बगाडे विचार व्यक्त करव्ंगे.९ मई को 'शिव कर्तुत्वाचे विविध पहलू' संदर्भ में मान्यवरों के शोध-प्रपत्रों का वाचन किया जायेगा.

Tuesday, November 24, 2009

Friday, April 18, 2008


चंद्रशेखर शिखरे यांचे प्रतिइतिहास हे पुस्तक जिजाई प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. शिवयारांच्या आयुष्यावर झगझगीत प्रकाश टाकणारे हे पुस्तक खरच अभ्यासपुर्ण आहे. या पुस्तकास आ. ह. साळुंखे यांची प्रस्तावना लाभली असून पुरुषोत्तम खेडेकर यांनीसुद्धा या पुस्तकाच्या सुरुवातीस आपले मनोगत स्पष्ट केले आहे. स्वतः लेखकाने प्रति इतिहास हे नाव ठेवण्यामागची व एकंदरीतच पुस्तक लिहिण्यामागची भुमिका स्पष्ट केली आहे.
लेखकाची भूमिका .....
प्रस्तुत लेखनप्रपंच म्हणजे शिवकालीन इतिहासाच्या संदर्भात ब्राम्हनी इतिहासकारानी निर्माण करून ठेवलेल्या काही समस्यांचे निराकरण करण्याचा अर्थात शिवइतिहासाचे शुद्धिकरण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र एवढाच मर्यादित हेतु नसून शिवकालीन इतिहासाच्या पुनरमांडनीचा हा प्रयत्न आहे .

pratiithas


प्रतिइतिहास .....
चलवलीना उद्ध्वस्त करण्यासाठी ब्राम्हनानी प्रतिइतिहास यशस्वीपने राबवल्या. त्याच सूत्रानुसार ब्राम्हानानी लिहिलेलेला धादांत खोटा इतिहास उध्वस्त करण्यासाठी 'प्रतिइतिहास' लिहिण्याची आवश्यकता आहे . सराव, अभ्यास ,कल्पकता,वाचन,चर्चा ,संग्राहकता,सम्यकदृष्टी,सामंजस्य ,न्यायबुध्ही, शब्दसंग्रह, भाषाप्रभुत्व शिवाय आत्यंतिक प्रामाणिकपना ह्यासारखे गुण आमच्या लेखकानी स्वीकारलेच पाहिजेत. 'शब्द' हा हजारो एटम बोम्ब पेक्षा खतरनाक असतो. त्यामूले वेगवेगले पर्याय आमच्याशी संवाद करू शकले पाहिजेत. माझे लिखाण हे माझ्यासाठी नसून वाचकासाठी आहे याचे भान ठेवलेच पाहिजे. चन्द्रशेखर शिखरे यानी याबाबतीत निश्चितच प्राविन्य मिलविले आहे .
-पुरुषोत्तम खेडेकर.

छत्रपति शिवाजी महाराज हे मानवी समाजाच्या सम्पूर्ण इतिहासतिल एक असे अत्यंत दुर्मिल व्यक्तिमत्व आहे, की ज्याच्यामध्ये अत्यंत कार्यक्षम अशा सामर्थ्याला अत्त्युच्च नैतिकतेचा गाभा होता आणि कमालीच्या मानवप्रेमी नैतिकतेला विजयशाली सामर्थ्याची अपार दृढ़ता होती.त्यांची नैतिकता विधायक आणि निर्णायक होती. अशा या महापुरुषाच्या उमद्या चरित्र्याचे काही महत्वाचे पैलू समाजापुढे ठेवन्याचे कार्य चन्द्रशेखर शिखरे यानी केले, याचा खरोखरच आनंद आहे
- आ. ह. सालूंखे
अनुक्रमणिका
1 हिंदू किंग व इस्लामिक इंडियाचे मिथक.
* शिवजन्मकालीन समाजवास्तव.
* हिंदू किंग चे मिथक
* शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक.
* अफझलखान भेट व ब्रम्हहत्या.
* मराठा आरमाराची उभारणी-सिंधूबंदी मोडली!
* जिझिया कराला विरोध.
* हिंदवी स्वराज्याची संकल्पना.
* इस्लामिक इंडियाचा भ्रम.
* काशी की कला जाती-मथुरा मशीद होती!
* औरंगजेबाने विश्वेश्वराचा नाश का केला?
* औरंगजेबाचा वांशिक दुराभिमान!
* संभाजीराजे व औरंगजेबाची मुलगी.
* राममंदिर व बाबरीमस्जिद प्रकरणातील तथ्य.
3 गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर कुलवाड़ीभूषण,बहुजनप्रतिपालक.
* गोब्राह्मणप्रतिपालक-एक खोटा डोल्हारा.
* ब्राम्हानांचा स्वराज्यविरोध.
* शिवजयंतीचे जनक - महात्मा ज्योतिराव फुले.
* धार्मिक विद्वेशाचे जनक -बाल टीलक.
* बाल तिलकांचे बेगडी शिवप्रेम.* क्षत्रियकुलवंतास.
* ब्राम्हनांचा राज्यभीषेकास विरोध.
* शिवाजीराजाना शुद्र म्हणविनारे ब्राम्हणी सिद्धांत.
* ब्राम्हनानी केलेली लुट.
* विरोध धर्माचा की धर्म ठेकेदारांचा?
* धर्म पालन नव्हे तर धार्मिक दहशतवाद.
* मराठे म्हणजे कोण?
* भोसले जाधव संबंध.
* ९६ कुली मराठ्यांचा विरोध.
* ब्राम्हणी धर्मानुसार मराठे शुद्रच!
* शिवरायांच्या वंशजांवर ब्राम्हणी धर्माचे प्रहार.
* रा.चीं.ढेरेंचा पुराव्याशिवाय शोध.
* कुलवाड़ीभूषण राजा.
* वतनदारांचा बंदोबस्त.
* स्त्री-शुद्रांचा राजा!
* युगपुरुष शिवराय.
* शिवाजी महाराजांचा अब्राम्हनी संघर्ष.
4 संस्कृति रक्षकांची विकृति आणि शिवइतिहासाचा शोध.
* ब्राम्हणशाहीची प्रतिक्रांति-पेशवाई.
* मानवतेवरील कलंक-पेशवाई.
* ब्राम्हनानी देश बुडविला!
* संभाजीराजांचे चारित्र्यहनन.
* संभाजीराजे -धर्मवीर की स्वातंत्र्यवीर?
* शिवचरित्राचे ब्राम्हनीकरण.
* बहुजन महापुरुशांचा छल.
* भांडारकरवर हल्ला का झाला?
* बाबासाहेब पुरंदरे - स्वनामधन्य विकृत शिवशाहीर!
* संस्कृतिसंवर्धन नव्हे ब्राम्हनीकरण!
* अस्मितांची लढाई आणि ब्राम्हनी कारस्थाने.
) Hindu king and Islamic India चे मिथक.
या भागामध्ये शिवाजीराजे खरंच फक्त हिंदुंचे राजे होते का? त्यावेळचा भारत खरंच इस्लामिक होता का? यासारख्या प्रश्नांचे साधार विवेचन केले आहे. James Lane सारख्या परकीय लेखकच्या लेखनामागे कोणती प्रेरणा असावी? या मुद्द्यावर तर्कपुर्ण विवेचन केले आहे.
गोब्राह्मणप्रतिपालक की कुळवाडीभूषण?,शिवराज्याभिषेकाचा वाद, शिवरायांचे खरे गुरू, रामदासांना शिवरायांचे गुरू बनवण्याचा कट, स्वनामधन्य शिवशाहीर ब.मो.पुरंदरे, ई. भाग मुळातून वाचावे असेच आहेत.